Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
छगन भुजबळ जेजे रुग्णालयात, प्रकृती स्थिर
ऐक्य समूह
Monday, March 05, 2018 AT 11:23 AM (IST)
Tags: mn3
5मुंबई, दि. 4 (प्रतिनिधी) : मनी लाँड्रिंग प्रकरणी तुरुंगात असलेले माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोटदुखी आणि दम्याचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना जेजेत सीसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी सांगितले.
छगन भुजबळ यांना शनिवारी पोटदुखी, मधुमेह आणि दम्याचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना तत्काळ आर्थर रोड तुरुंगातून जेजे रुग्णालयात हलविण्यात आले. जेजेत आधी त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांची प्रकृती नाजूक असल्याने त्यांना   सीसीयूत हलविण्यात आले. आता त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. भुजबळांना अन्ननलिका आणि आतड्यांचाही आजार असल्याचे सांगण्यात आले. प्रकृती बिघडत असल्याने मागच्या वर्षी भुजबळ यांना 35 पेक्षा जास्त वेळा बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.


© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: