Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
माझ्यावरील आरोप राजकीय हेतूने प्रेरित : कार्ती
ऐक्य समूह
Monday, March 05, 2018 AT 11:19 AM (IST)
Tags: na4
5नवी दिल्ली, दि. 4 (वृत्तसंस्था) : आयएनएक्स मीडिया प्रकरणी अटकेत असलेले कार्ती चिदंबरम यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. माझ्यावर करण्यात आलेले आरोप खोटे व राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा कार्ती यांनी केला.
सीबीआय कोठडीत असलेल्या कार्ती चिदंबरम यांना आज मुंबईत आणण्यात आले होते.  
आर्थर रोड कारागृहात कार्ती तसेच पीटर व इंद्राणी मुखर्जी यांना समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर कार्ती यांना पुन्हा दिल्लीत आणण्यात आले असून कार्ती यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
दरम्यान, कार्ती यांनी 2007 मध्ये एफआयपीबी क्लिअरन्ससाठी सुमारे 6 कोटी रुपयांची मागणी केली होती, असा आरोप इंद्राणी व पीटर यांनी सीबीआय चौकशीत केला होता. त्याआधारे सीबीआयने कार्ती यांना अटक केली असून त्यांची तीन दिवसांपासून कसून चौकशी सुरू आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: