Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सातार्‍यातून पळालेल्या आरोपीला पुण्यात अटक
ऐक्य समूह
Monday, March 05, 2018 AT 11:30 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 4 ः जिल्हा रुग्णालयाच्या परिसरातून पोलिसांच्या हाताला झटका देवून पळालेल्या विश्रुत भालचंद्र नवातेला स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून पुण्यातून अटक केली.
विश्रुत नवाते पोलिसांच्या ताब्यातून पसार झाल्याने त्याला पुन्हा पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे होते. त्यानुसार पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी फरार आरोपीला पकडण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने तपासाला सुरवात केली असता नवाते हा पुणे येथील पाषाण रोड येथे एका इलेक्ट्रिकच्या दुकानामध्ये वस्तू खरेदी करण्यासाठी येणार असल्याची माहिती एका बादमीदाराने स्थानिक गुन्हे शाखेला दिली. त्यानुसार तपास पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने इलेक्ट्रिक्स दुकानात सापळा रचून फरारी आरोपी नवाते याच्या मुसक्या आवळल्या. नवाते याची पुन्हा पोलीस कोठडीत रवानगी झाल्यामुळे सामान्य जनतेच्या मनात पोलीस दलाविषयी आदराची भावना निर्माण झाली आहे. सदर कारवाईत
पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव, पोलीस उपनिरीक्षक प्रसन्ना जर्‍हाड, सुरेंद्र पानसांडे, मोहन घोरपडे, पोलीस हवालदार विजय शिर्के, तानाजी माने, रामा गुरव, पोलीस नाईक विजय कांबळे, मुबीन मुलाणी, शरद बेबले, नितीन गोगावले, प्रवीण फडतरे, रूपेश कारंडे, विक्रम पिसाळ, नीलेश काटकर, मारूती लाटणे, संजय जाधव यांनी सहभाग घेतला.
 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: