Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
लष्करी कॅम्पवर हल्ला; दहशतवादी ठार
ऐक्य समूह
Monday, March 05, 2018 AT 11:18 AM (IST)
Tags: na3
5जम्मू-काश्मीर, दि. 4 (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ला केला. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला भारतीय लष्कराने जोरदार प्रत्युत्तर दिले. यात एक दहशतवादी ठार झाला आहे.
शोपियान जिल्ह्यातील पिंजोरा परिसरात दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या कॅम्पवर अंदाधुंद गोळीबार केला. भारतीय जवानानींही या गोळीबाराला सडेतोड प्रत्युत्तर दिले. या गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला आहे. ही घटना रात्री 8च्या सुमारास घडली. सुरक्षादलाची शोधमोहीम अद्याप सुरू आहे. लष्कर आणि दहशतवादी यांच्यात गोळीबार सुरूच आहे. भारतीय जवानांवर गोळीबार करणार्‍या दहशतवाद्यांची संख्या नेमकी किती आहे, हे अद्याप समजू शकले नाही. जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी कारवायांत वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात सुंजवानमधील झालेल्या आर्मी कॅम्पवरील दहशतवादी हल्ल्यात 6 भारतीय जवान शहीद झाले होते. तसेच एका नागरिकाचाही मृत्यू झाला होता. लष्कराने हाती घेतलेल्या ऑपरेशनदरम्यान 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: