Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

दक्षिण आफ्रिकेच्या दुसर्‍या डावात 9 बाद 293 धावा
ऐक्य समूह
Monday, March 05, 2018 AT 11:38 AM (IST)
Tags: sp2
5डर्बन, दि. 4 (वृत्तसंस्था) : एडन मार्क्रमचे झुंजार व चिवट शतक आणि त्याला क्विंटन डी कॉकची मिळालेली तितकीच झुंजार साथ यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. विजयासाठी 417 धावांचे विक्रमी लक्ष्य समोर असताना कसोटीच्या चौथ्या दिवशी दुसर्‍या डावात आफ्रिकेच्या खेळाडूंनी 89 षटकांमध्ये 9 बाद 293 अशी मजल मारली आहे. विजयासाठी यजमान संघाला अजून 124 धावा आवश्यक आहेत. मंद प्रकाशामुळे आजचा खेळ थांबविण्यात आला. खेळ थांबला त्यावेळी डी कॉक 81 धावांवर तर मॉर्केल 0 धावांवर खेळत होता.
या कसोटीत पहिल्या दिवसापासून मैदानात नाट्य रंगले. पाहुण्या कांगारूंनी पहिल्या डावात 351 धावांची मजल मारल्यावर यजमान दक्षिण आफ्रिकेला केवळ 162 धावांची मजल मारता आली होती. मिशेल स्टार्क (5 बळी) व नॅथन लियॉन (3 बळी) यांनी यजमान संघाची त्रेधा उडवली. पहिल्या डावात 189 धावांची जबरदस्त आघाडी मिळवणार्‍या कांगारूंचा दुसरा डाव केवळ 227 धावांत संपुष्टात आला. दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजने चार तर मॉर्नी
मॉर्केलने 3 बळी घेऊन कांगारूंना मोठी मजल मारू दिली
नाही. मात्र, पहिल्या डावातील मोठ्या आघाडीमुळे कांगारूंनी यजमानांसमोर विजयासाठी 417 धावांचे कठीण व विक्रमी लक्ष्य ठेवले.
या लक्ष्यासमोर यजमान संघ दबून जाईल असे वाटले होते. पहिल्या डावात झुंजार अर्धशतक करणारा एबी डीव्हिलियर्स शून्यावरच धावबाद झाला तर भरवशाचा हाशिम आमला (9), कर्णधार फाफ ड्यू प्लेसी (4) हेदेखील अपयशी ठरले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ लवकर गुडघे टेकणार, असे वाटत असतानाच एडन मार्क्रमने खेळाची सूत्रे आपल्या हाती घेत झुंजार शतक ठोकले. त्याने थ्युनिस डी ब्रुईनच्या साथीत धावफलक हलता ठेवला. ब्रुईन 36 धावा काढून बाद झाल्यावर मार्क्रमने डी कॉकच्या साथीत झुंज पुढे सुरू ठेवली. मार्क्रम 143 धावा
काढून बाद झाल्यानंतर मात्र आफ्रिकेचे खेळाडू जास्त वेळ मैदानात टिकू शकले नाहीत. त्यांचे खेळाडू एका पाठोपाठ बाद होत गेले. परंतु एका बाजूने डी कॉकने चांगली लढत दिली आहे.  खेळ थांबला त्यावेळी डी कॉक 81 धावांवर तर मॉर्केल 0 धावांवर खेळत होता.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: