Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
भाजपला टक्कर देण्यासाठी सपा-बसपा एकत्र
ऐक्य समूह
Monday, March 05, 2018 AT 11:13 AM (IST)
Tags: na2
5गोरखपूर, दि. 4 (वृत्तसंस्था) : भाजपचा विजयरथ रोखण्यासाठी 25 वर्षांची कटुता विसरून उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष एकत्र आले आहेत. गोरखपूर आणि फूलपूर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी या दोन्ही पक्षांनी आघाडी केली आहे.
गोरखपूर आणि फूलपूर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी 11 मार्च रोजी मतदान होत असून 14 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. गोरखपूरमधून विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ खासदार होते तर फूलपूर मतदारसंघातून उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य खासदार होते.     
या दोघांच्या राजीनाम्यानंतर या जागा रिक्त झाल्या होत्या. या दोन्ही जागा भाजपसाठी प्रतिष्ठेच्या आहेत. भाजपला जोरदार टक्कर देण्यासाठीच सपा-बसपाने आपसातील राजकीय वैर बाजूला ठेवले आहे. या आघाडीमुळे ईशान्येत दणदणीत विजय मिळवणार्‍या भाजपपुढे आणखी एक आव्हान असणार आहे.
दरम्यान, राज्यसभा निवडणुकीतही सपा उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय बसपाने घेतला असल्याचे पक्षातील सूत्रांकडून सांगण्यात आले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: