Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कैलास स्मशानभूमीस घाडगे कुटुंबीयांकडून देणगी
ऐक्य समूह
Monday, March 05, 2018 AT 11:39 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 4 : श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट आणि लोकसहभागातून उभारलेल्या कैलास स्मशानभूमीच्या देखभालीसाठी घाडगे कुटुंबीयांनी ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांच्याकडे देणगी सुपूर्त केली.
14 वर्षापूर्वी उभारलेली कैलास स्मशानभूमी महाराष्ट्रात आदर्शवत ठरली असून एखादा प्रकल्प उभा करणे सोपे असते; परंतु त्याची देखभाल करणे अवघड असते. सातारकरांच्या जिव्हाळ्याची व अत्यंत गरजेची स्मशानभूमी गेली 14 वर्षे सांभाळून एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. शेणीमध्ये अंत्यसंस्कार करून पर्यावरणाचे रक्षण केले जात असून आजपर्यंत जवळपास 20 हजार झाडांची कत्तल थांबली असून महिला बचत गटांना व्यवसाय उपलब्ध झाला आहे. कैलास स्मशानभूमीत लावलेल्या समाज प्रबोधन फलकांमुळे कित्येक जणांच्या जीवनात बदल झाला आहे. ऑनलाइन स्काइपच्या माध्यमातून अंत्यविधी पाहण्याची सोय या ठिकाणी उपलब्ध केली आहे. कोणत्याही प्रकारचे शासकीय, निमशासकीय अनुदान या प्रकल्पास मिळत नाही. श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट व लोक वर्गणीतून गेली 14 वर्षे या स्मशानभूमीची देखभाल ट्रस्टच्या माध्यमातून केली जात आहे. दरमहा सत्तर हजार रुपये एवढा देखभालीसाठी खर्च येत असून याच जाणीवेतून आम्ही देखभालीसाठी देणगी देऊन खारीचा वाटा उचलत असल्याचे घाडगे कुटुंबीयांनी सांगितले व यथाशक्ती देणगी देऊन सातारकरांनी सहकार्य करावे, असे आवाहन घाडगे कुटुंबीयांनी केले.
याप्रसंगी घाडगे कुटुंबातील राजेंद्र घाडगे, रणजित घाडगे, अनिल घाडगे, सुनील घाडगे व संतोष घाडगे उपस्थित होते.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: