Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
एक्स्प्रेस वेवर सलग सुट्ट्यांमुळे वाहतूक कोंडी
ऐक्य समूह
Saturday, March 03, 2018 AT 11:27 AM (IST)
Tags: mn5
5पुणे, दि. 2 (प्रतिनिधी) : सलग सुट्या व एक्स्प्रेस वे स्लो होणे आता एक समीकरणच झाले आहे. परिणामी जोडून आलेल्या सुट्ट्या व वाहतुकीच्या कोंडीमुळे वाहनचालक व प्रवाशांना मुंबई-पुणे प्रवास हा त्रासदायक वाटू लागला आहे. होळी सणाच्या सुट्टीसोबत शनिवार व रविवारची सुट्टी जोडून आल्याने या तीन दिवसांच्या सुट्टीचा आनंद घेण्याकरता पर्यटक घराबाहेर पडल्यामुळे गुरुवारी रात्रीपासूनच एक्स्प्रेस वे वर वाहतूक जामला प्रवाशांना सामोरे जावे लागले आहे. रात्रीपासूनच हा एक्स्प्रेस वे कासवगतीप्रमाणे बनला आहे. गुरुवारी रात्री 11 पासून दोन्ही बाजूंच्या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र आज सकाळी मुंबईकडे येणारा मार्ग मोकळा झाला. पण पुण्याकडे जाणारी वाहतूक मात्र संथगतीने सुरू होती.
गुरुवारी रात्री गोल्डन अवर्समुळे अवजड वाहने ही खोपोली व लोणावळा परिसरात रोखून धरली होती. ती उशिरा सोडण्यात आल्याने रात्रभर एक्स्प्रेस वे वर वाहतूक कोंडी सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. शुक्रवारी (2 मार्च) पहाटेपासून वाहनांची संख्या वाढू लागल्याने पुण्याकडे येणार्‍या मार्गावर आडोशी बोगदा ते अमृतांजन पुलादरम्यान वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक ठप्प झाली नसली तरी अतिशय संथ गतीने ती सुरू असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान, आज दिवसभर एक्स्प्रेस वे वर असेच चित्र पाहायला मिळाले. या मार्गावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांनी वेळेचे नियोजन करूनच घराबाहेर पडावे अथवा पर्यायी मार्गाचा अवलंब करावा. होळी, रंगपंचमी, शनिवार आणि रविवार अशा सलग सुट्ट्या आल्याने या मार्गावर वाहतुकीचा ताण पाहायला मिळत आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: