Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अयोध्या प्रकरणी मौलाना नदवी यांचे घुमजाव
ऐक्य समूह
Saturday, March 03, 2018 AT 11:15 AM (IST)
Tags: na2
5लखनऊ, दि. 2 (वृत्तसंस्था) : अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिरच उभारले पाहिजे, अशी भूमिका मांडणारे मौलाना सलमान नदवी यांनी अचानक घुमजाव केले आहे. ‘राम मंदिरप्रश्‍नी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहिली पाहिजे, तेच योग्य आहे,’ असे नदवी यांनी स्पष्ट केले. नदवी यांनी अचानक घेतलेल्या या भूमिकेमुळे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.
गुरुवारी रात्री मौलाना नदवी यांनी लखनऊमध्ये अध्यात्मिक गुरू श्री. श्री. रविशंकर यांची भेट घेतली होती. 
त्यानंतर त्यांनी अयोध्या प्रकरणात पडणार नसल्याचे स्पष्ट केले. अयोध्या प्रकरणात आपण पक्षकार नसल्याचेही त्यांनी सांगितले. ‘राम मंदिर आणि बाबरी मशिदीचा मुद्दा आम्ही आमच्या अजेंड्यातून काढून टाकला आहे. त्यामुळे या प्रकरणात जे पक्षकार आहेत त्यांनीच आता या त्यावर तोडगा काढावा,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. अयोध्याबाबतचे यापूर्वीचे आपले वक्तव्य मीडियाने काटछाट करून दाखविल्याचा दावाही त्यांनी केला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: