Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
छत्तीसगडमध्ये 10 नक्षलवादी ठार
ऐक्य समूह
Saturday, March 03, 2018 AT 11:04 AM (IST)
Tags: mn1
एक जवान शहीद तेलंगणा व छत्तीसगड पोलिसांची कारवाई
5छत्तीसगड, दि. 2 (वृत्तसंस्था) : छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये सुरक्षा दलांनी 10 नक्षलवाद्यांना यमसदनी धाडले. पुजारी कांकेर या नक्षलग्रस्त भागात तेलंगणा पोलीस आणि छत्तीसगड पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. विशेष महासंचालक डी. ए. अवस्थी (नक्षलविरोधी मोहीम) यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. या कारवाईदरम्यान एक जवान शहीद झाला आहे.
या चकमकीदरम्यान ग्रे हाऊंडस पथकातील सुशील कुमार हा जवान गंभीररीत्या जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सूत्रांच्या माहितीनुसार, पोलिसांना 50 ते 60 नक्षलवादी एकत्र जमणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. यावेळी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. यामध्ये 10 नक्षलवाद्यांचा मृत्यू झाला तर उर्वरित नक्षलवादी पळून गेले. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये दामोदर आणि लक्ष्मणन या दोघांचाही समावेश आहे. दामोदर उत्तर तेलंगण स्पेशल झोनचा प्रमुख होता.
गेल्याच आठवड्यात सुकमा येथे सीआरपीएफ आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. यावेळी 08 कोब्रा बटालियनचे कमांडो प्रकाश चंद यांनी अतुलनीय शौर्याचे दर्शन घडवले होते. या चकमकीदरम्यान त्यांच्या पायात एक गोळी लागली. मात्र, त्यांनी हार न मानता आठ कि.मी. अंतर चालत पार करून रुग्णालय गाठले होते. तत्पूर्वी 18 फेब्रुवारीला सुकमा येथे पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये तब्बल पाच तासांची चकमक झाली होती. पोलिसांनी चकमकीत एका नक्षलवाद्याला ठार केले होते. यावेळी एसटीएप आणि डीआरजीचे दोन जवानही शहीद झाले होते.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: