Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कार्ती चिदंबरमची मॅरेथॉन चौकशी
ऐक्य समूह
Saturday, March 03, 2018 AT 11:17 AM (IST)
Tags: na4
5नवी दिल्ली, दि. 2 (वृत्तसंस्था) : आयएनएक्स मीडिया मनी लाँड्रिंग प्रकरणात सीबीआयने अटक केलेले पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती यांना गुरुवारी विशेष न्यायालयाने सहा दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली. त्यानंतर शुक्रवारी सीबीआयने त्यांची कसून मॅरेथॉन चौकशी केली. नवी दिल्लीच्या सीबीआयने आपल्या मुख्यालयामध्ये कार्ति यांची पाच ते सहा तास चौकशी केली. यावेळी त्यांना पुरावे दाखवत त्यावर स्पष्टीकरण मागितले. यावेळी कार्ती यांचे वकील त्यांना भेटण्यासाठी सीबीआय मुख्यालयात आले होते. आज सकाळी आठ वाजल्यापासून सीबीआयने कार्ती चिदंबरम यांची चौकशी सुरू केली होती.
मिळालेल्या वृत्तानुसार, कार्ती यांना सुरुवातीला एफपीआयबी अप्रूवलवर विचारणा केली. सर्व पुरावे सीबीआयने यावेळी कार्ती यांच्यापुढे ठेवत त्यावर स्पष्टीकरण मागितले. 
आपल्या विदेश दौर्‍यावर असताना वित्त मंत्रालयाच्या गुप्त कागदपत्रांशी छेडछाड केली होती. त्यावरही प्रश्‍न विचारण्यात आले आहे. त्याचप्रमाणे चेस मॅनेजमेंटबाबतीतही प्रश्‍न विचारण्यात आले. यावेळी सर्व पुरावे समोर ठेवले होते. जेणेकरून कार्ती यांना खोटे बोलता येणार नाही, असा सीबीआयचा उद्देश होता.  काल विशेष न्यायाधीश सुनील राणा यांनी कार्ती यांची कोठडी 6 मार्चपर्यंत वाढविली. तथापि, कार्ती यांच्या वकिलांना त्यांना दररोज सकाळ व सायंकाळ एक-एक तास भेटण्यास परवानगी दिली आहे. सीबीआयने न्यायालयात सांंगितले, की कार्ती यांनी विदेशातून जाऊन
जे काही केले त्याचे आमच्याकडे ठोस पुरावे आहेत. कार्ती चिदंबरम यांच्यावर शीना बोरा हत्याकांडातील आरोपी पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांच्या आयएनएक्स मीडिया या कंपनीला 2007 मध्ये नियमापेक्षा अधिक विदेशी गुंतवणूक मिळवून दिल्याचा आरोप आहे. कंपनीला फक्त 4.62 कोटींची विदेश गुंतवणूक करण्याची परवानगी असताना त्यांनी 305 कोटी रुपये उभे केले होते. कार्ती चिदंबरम यांनी आपल्या वडिलांच्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोपही
लावण्यात आला होता.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: