Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
दहावीच्या परीक्षेला डमी बसण्याचे प्रकरण भोवले
ऐक्य समूह
Saturday, March 03, 2018 AT 11:07 AM (IST)
Tags: lo1
दोन जणांवर गुन्हा दाखल
5सातारा, दि. 2 : दहावीच्या परीक्षेला डमी बसल्या प्रकरणात दोन जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 याबाबत अधिक माहिती अशी, दहावीच्या परीक्षेला  वडूथ केंद्रावर गणेश जगन्नाथ पवार या विद्यार्थ्याच्या ऐवजी शुभम तुकाराम पवार हा मुलगा डमी म्हणून बसला होता. त्यासाठी गणेशचे वडील जगन्नाथ पवार यांनी शुभम याला जबरदस्ती केली होती. केंद्रावरील पर्यवेक्षक विठ्ठल रंगराव गुजले (वय 51, रा. दौलतनगर) यांना ही गोष्ट निदर्शनास आल्यानंतर गणेश पवार व शुभम पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: