Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
ग्रामपंचायत निकालानंतर विकासनगरमध्ये राडा
ऐक्य समूह
Friday, March 02, 2018 AT 11:12 AM (IST)
Tags: lo3
5सातारा, दि. 28 : ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विकासनगर येथे बुधवारी रात्री सातच्या सुमारास दोन गटात मारामारी झाली. यामध्ये दोन जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, खेड ग्रामपंचायतीच्या एका जागेची पोटनिवडणूक जाहीर झाली होती. यासाठी झालेल्या मतांची मोजणी बुधवारी झाली. पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखालील राजेंद्र सोनटक्के हे विजयी झाले. बुधवारी रात्री विजयी उमेदवार व त्यांचे समर्थक विकासनगर परिसरात फिरत होते. या ठिकाणी फटाके आणि गुलाल उधळण्याच्या वादातून दोन गटात मारामारी झाली. यामध्ये जखमी झालेले रामा भगवान कांबळे (वय 32, रा. प्रतापसिंहनगर) हे उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी निवडणुकीच्या वादातून शामराव माने, रोहित माने, दत्ता माने व इतरांनी अडवून गज, दांडक्याने मारहाण केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या दरम्यान शामराव माने यांच्या गटातील काहीजण उपचारासाठी जिल्हा   रुग्णालयात दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत दोन्ही गटातील जखमींवर उपचार करण्याची प्रक्रिया जिल्हा रुग्णालयात सुरू होती. या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली नव्हती.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: