Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
राष्ट्रवादी काँग्रेसचा आज मुंबईत ‘हल्लाबोल’
ऐक्य समूह
Wednesday, February 28, 2018 AT 11:10 AM (IST)
Tags: mn4
5मुंबई,दि.27 (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर राज्यभर हल्लाबोल आंदोलन केल्यानंतर आता मुंबईच्या प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस विधानभवनावर हल्लाबोल मोर्चा काढणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मुंबई विभागीय अध्यक्ष सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले जाणार आहे. मुंबईत सध्या झोपडपट्टी पुनर्वसन, जुन्या इमारतींचा पुनर्विकास, पेट्रोल डिझेलची भरमसाट दरवाढ, गॅस दरवाढ तसेच  डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाला लागत असलेला विलंब अशा विविध प्रश्‍नांकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सचिन अहिर यांनी सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: