Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
आरफळ येथील दोघे तडीपार
ऐक्य समूह
Wednesday, February 28, 2018 AT 11:24 AM (IST)
Tags: lo3
5सातारा, दि. 27 : जबरी चोरीसह विविध गुन्हे दाखल असलेल्या आरफळ, ता.सातारा येथील दोन युवकांना जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सातारा जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार केले आहे. तडीपार केलेल्यांची अविनाश विलास दडस (वय 23) व संदीप दिलीप साबळे (दोघे रा.आरफळ) अशी नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, अविनाश दडस व संदीप साबळे या दोघांची टोळी असून दडस हा टोळीप्रमुख आहे. संशयित सर्वसामान्य लोकांना अडवून जबरी चोरीचे गुन्हे करत होते. विविध गुन्हे दाखल झाल्यानंतर दोघांवर अटकेची कारवाई केली. अटकेची कारवाई केल्यानंतरही संशयितांमध्ये सुधारणा होत नव्हती. सर्वसामान्यांना संशयितांचा उपद्रव होत असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत होती. या दोन्ही संशयितांमुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाल्याने सातारा तालुका पोलिसांनी दोघांविरुद्ध तडीपारीचा प्रस्ताव तयार करुन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे पाठवला होता. दोघा संशयितांची तडीपारीची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर अखेर पोलीस अधीक्षक संदीप पाटील   यांनी दोघांना सातारा जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार केले. तडीपारीच्या आदेशाची सुनावणी झाल्यानंतर 48 तासाच्या
आत कारवाई केली जाणार आहे. सातारा शहरासह जिल्ह्यातील आणखी जणांच्या टोळ्या पोलिसांच्या रडारवर असून लवकरच पुढील कारवाई होणार आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: