Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
महिलेवर बलात्कार करून संशयिताचे पलायन
ऐक्य समूह
Monday, February 26, 2018 AT 11:32 AM (IST)
Tags: re4
5कराड, दि. 25 : शेतात कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेवर बलात्कार करून असीफ मुजावर (पाडळी, ता. कराड) हा संशयित पळून गेल्याची घटना शनिवारी (दि. 24) दुपारी घडली. या प्रकरणी मुजावर याच्यावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कराड तालुक्यातील एक अविवाहित महिला एकटी राहते. ती शनिवारी दुपारी कपडे धुण्यासाठी शेतातील विहिरीवर गेली असता पाठीमागून अचानक आलेल्या असीफ मुजावरने तिला मिठी मारली. तिचे तोंड दाबून त्याने तिच्यावर बलात्कार केल्यानंतर तो तेथून पळून गेला. पीडित महिला रडत गावात आल्यानंतर हा प्रकार लोकांना समजला. दुपारच्या वेळी असीफ मुजावर हा पळत जात असल्याचे काहींनी पाहिले होते. त्यामुळे असीफने महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव तपास करत आहेत.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: