Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
आंबेघर येथील अपघातात तीन ठार
ऐक्य समूह
Monday, February 26, 2018 AT 11:16 AM (IST)
Tags: re2
5मेढा, दि. 25 : केळघर-मेढा रोडवर आंबेघर तर्फ मेढा येथे झालेल्या आपघातात दोन जण जागीच ठार तर एक जण उपचारदरम्यान मृत झाला. दरम्यान आरोपींना अटक करेपर्यंत बॉडी ताब्यात घेणार नाही, असे नातेवाईकांनी ठरविल्यामुळे काही काळ वातावरण तंग होते. परंतु डीवायएसपी डॉ. के. ए. धरणे यांनी आरोपींना लवकरच अटक करू असे आश्‍वासन दिल्याने वातावरण शांत झाले. तसेच या चारही संशयित आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.
यावेळी घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की भामघर, ता. जावली येथील तीन युवक चक खख, ॠऊ 3889 या दुचाकीवरुन केळघरकडे जात असताना महाबळेश्‍वरकडून सातार्‍याकडे जाणार्‍या अ‍ॅसेट कंपनीची चारचाकी गाडी नं. चक11, ध 4875 या गाडीने रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास जोराची धडक दिलेने भामघर, ता. जावली येथील युवक प्रशांत कोंडिबा सावले, वय 35 वर्षे, सामिर बबन पार्टे, वय 29 वर्षे हे जागेवरच मृत्यूमुखी पडले असून संजय दगडू सावले, वय 31 यास पुढील उपचारासाठी सातारा येथे हलविण्यात आले असता मयत झाले. यावेळी चारचाकी वाहनाचे चालक कुलदीप अशोक भोसले यांना ताब्यात घेतले परंतु प्रशांत लोंबटे, रा. शाहूपुरी सातारा, रवींद्र चांगण, रा. कण्हेर यांच्यासह असून एकजण पसार झाल्याने त्यांना अटक करा मगच आम्ही बॉड्या ताब्यात घेवू असा हट्ट नातेवाईकांनी धरला. त्यामुळे वातावरण तंग झाले. सदर घटनेची नोंद मेढा पोलिसांनी तत्काळ केली. दरम्यान दि. 24 रोजी रात्री 8.30 अपघात झाला होता. परंतु मयतांचे पोस्टमार्टम मात्र दु. 12.30 नंतर झाले. डीवायएसपी डॉ. के. ए. धरणे यांनी लोकांना शांततेचे आवाहन करीत लवकरच आरोपींना ताब्यात घेतो असे आश्‍वासन दिले. संशयित आरोपीवर भादंविसंकलम 304 (2), 279,201 आणि 34 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या अपघाताचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक जीवन माने करीत आहेत.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: