Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
गोवारे येथे दहा एकरातील ऊस जळून खाक
ऐक्य समूह
Monday, February 26, 2018 AT 11:35 AM (IST)
Tags: re6
5कराड, दि. 25 : गोवारे, ता. कराड येथे गावानजीक असलेल्या सोळा बिघे नावाच्या शिवारात वीजेच्या तारांच्या घर्षणाने निर्माण झालेल्या ठिणग्यांमुळे सुमारे दहा एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाल्याची घटना रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीत 14 शेतकर्‍यांचा ऊस जळाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गोवारे, ता. कराड गावानजीक सोळा बिघे नावाचे शिवारात पुतळाबाई मारुती पाटील, राजेंद्र शंकर पाटील, बाळासाहेब जगन्नाथ पाटील, बाळासाहेब शामराव पाटील, संपत रंगनाथ पाटील, राजाराम जिजाबा पाटील, सुनील बाळकृष्ण पाटील, पतंगराव जोती पाटील, शरद गणपती पाटील, दत्तात्रय सखाराम पाटील, नीलेश भानुदास महाडिक, अमोल शंकर पाटील, समीर पाटील, संपत जिजाबा पाटील यांचे उसाचे क्षेत्र आहे. रविवारी दुपारी अडीच वाजण्याचे सुमारास वीजवाहक तारांच्या घर्षणामुळे ठिणग्या पडून उसाचे शिवारास आग लागली. दुपारची वेळ असल्याने व उन्हाची तीव्रता असल्याने आगीने रौद्ररुप धारण केले. काही वेळातच ही आग शिवारात पसरल्याने सुमारे दहा एकरातील ऊस जळून खाक झाला. या आगीत एकूण 14 शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: