Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
वाकेश्‍वर येथे जमिनीच्या वादातून एकाचा खून
ऐक्य समूह
Monday, February 26, 2018 AT 11:20 AM (IST)
Tags: re3
एक जण जखमी; तीन संशयितांना अटक
5वडूज, दि. 25 : वाकेश्‍वर, ता. खटाव येथे जमिनीच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत महादेव मुगुटराव फडतरे (वय 63) यांचा मृत्यू झाला असून या प्रकरणी वडूज पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारामारीत एक जण जखमी झाला असून पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, गुलाब फडतरे, संतोष फडतरे, गणेश वाघ हे रविवारी सकाळी 11.30 च्या सुमारास महादेव फडतरे यांच्या जमिनीत अतिक्रमण करुन जेसीबी व ट्रॅक्टरच्या साहाय्याने ताल तोडत होते. महादेव फडतरे आणि त्यांची मुले महेश आणि महेंद्र फडतरे यांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता तिघांनी महादेव फडतरे व त्यांच्या मुलांना शिवीगाळ,  दमदाटी व मारहाण केली. यामध्ये महादेव फडतरे यांच्या छातीवर मारहाण झाल्याने त्यांचा मृत्यू झाला तर महेश फडतरे यांच्या मांडीला संतोष फडतरे यांनी चावा घेऊन जखमी केले. या प्रकरणी महेंद्र महादेव फडतरे यांनी वडूज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत काळे, पोलीस निरीक्षक यशवंत शिर्के यांनी घटनास्थळावर धाव घेऊन तिन्ही संशयितांना शिताफीने अटक केली. पोलीस उपनिरीक्षक धरणीधार कोळेकर तपास करत आहेत.


© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: