Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
भुशी डॅमच्या धर्तीवर कास धरणावर पर्यटनपूरक प्रकल्प करा
ऐक्य समूह
Saturday, February 24, 2018 AT 11:22 AM (IST)
Tags: lo3
पर्यटनाबरोबर रोजगारवाढीला चालना मिळेल : महाबळेश्‍वर, लोणावळ्यासारखे आकर्षण निर्माण होईल
5सातारा, दि. 23 : सातारा जिल्हा हा निसर्गसंपन्न आणि वैविध्यतेने नटलेला आहे. जिल्ह्यात अनेक पर्यटनस्थळे असून त्याचा विकास केल्यास पर्यटन वाढून त्यातून रोजगार वाढणार आहे. कास पठाराचा जागतिक वारशामध्ये समावेश झालेला आहेच. शनिवारी कास धरण उंची वाढवणे प्रकल्पास सुरुवात होणार आहे. या ठिकाणी लोणावळा येथील भुशी डॅमच्या धर्तीवर प्रकल्प राबवल्यास पर्यटन वाढण्यास मदत होणार असून पर्यटकांना वर्षभर पर्यटनाचा आनंद घेता येईल. हा प्रकल्प कमी खर्चिक असून पर्यटकांच्या दृष्टीने सुरक्षितही असणार आहे. त्यामुळे धरण उंची वाढवणे प्रकल्पाबरोबरच पर्यटन वाढीसाठीच्या प्रकल्पाचा त्यामध्ये समावेश करण्याची मागणी होतआहे.
गेल्या काही वर्षांपासून कास पठारावर फुलांच्या हंगामात तीन ते चार महिने गर्दी असते.  वर्षभरही पर्यटक या परिसरात कास तलाव पाहण्यास येत असतात. फुलांच्या हंगामावेळी येथील स्थानिकांना रोजगार उपलब्ध होत असतो. त्यामुळे मुंबई-पुण्याला रोजगारानिमित्त जाणार्‍यांच्या संख्येत घट झाली आहे. लवकरच कास धरण उंची वाढवणे प्रकल्पाचे काम सुरु होणार आहे. या ठिकाणी लोणावळा येथील भुशी डॅमच्या धर्तीवर सांडव्यावरुन पाणी वाहण्यासाठी पायर्‍या बांधल्यास पर्यटकांना पावसाळी पर्यटनांचा सुरक्षितपणे मनमुराद आनंद लुटण्याची सुविधा उपलब्ध होईल.  त्यासाठी आतापासूनच नियोजन केल्यास कास धरण उंची वाढवणे प्रकल्पाच्या पूर्तीवेळीस हाही प्रकल्प पूर्ण होईल. त्यामुळे त्यासाठी संबंधित सर्वांनी पुढाकार घेण्याची मागणी होऊ लागली आहे.भुशी डॅमसारखा प्रकल्प राबवल्यास येथे गर्दी होईल. सातारा शहरातील सर्व हॉटेल व्यावसायिकांना व्यवसाय मिळेल. कास परिसरात असणार्‍या गावातील तरुणांना रोजगार मिळेल. एकूणच सगळे आर्थिक चित्र बदलून टाकणारा हा प्रकल्प ठरणार आहे. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी आणि त्यांच्या सातारा विकास आघाडीने ही सूचना स्वीकारल्यास कासबरोबर सातारा शहराचा व्यावसायिकदृष्ट्या चेहरा बदलेल. या सूचनेचा नेत्यांनी आणि प्रशासनाने सकारात्मक दृष्टीने विचार करावा, अशी जनतेची
अपेक्षा आहे. 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: