Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
खटाव तालुक्यातील 15 चारा छावणीचालकांवर गुन्हे
ऐक्य समूह
Saturday, February 24, 2018 AT 11:23 AM (IST)
Tags: re3
5वडूज, दि. 23 : करारनाम्यातील अटी व शर्तींचे उल्लंघन केल्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खटाव तालुक्यातील 15 चारा छावणीचालकांवर वडूज पोलीस ठाण्यात भादंवि कलम 188 अन्वये गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील दिग्गजांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
खटाव तालुक्यात 2012-13 व 2013-14 या कालावधीत दुष्काळी परिस्थिती असल्याने शासनाकडून जनावरांच्या चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या. या छावण्या काही संस्थांना चालवण्यास देण्यात आल्या होत्या. खटाव तहसील कार्यालयाच्या अंतर्गत वडूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्‍या 16 छावणी चालकांवर  करारनाम्यातील अटींचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. याबाबत जिल्हाधिकार्‍यांचे आदेश मिळताच प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे व तहसीलदार सुशील बेल्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडलाधिकार्‍यांनी 15 संस्थाचालकांविरुद्ध फिर्याद नोंदवली आहे.
त्यानुसार कै. सदाबाई साबळे नारी निकेतन संस्था, वडूज (बाळासाहेब तुकाराम साबळे, वाकेश्‍वर व भुरकवडी छावणी), अंबवडे विकास सेवा सोसायटी (विजय रामचंद्र पवार), मांडवे विकास सेवा सोसायटी (राजूभाई अब्दुल मुलाणी, मांडवे), सुशिक्षित बेकार सहकारी दूध संस्था सिद्धेश्‍वर कुरोली (शशिकला मुगुटराव देशमुख), वडूज विकास सेवा सोसायटी (महादेव सीताराम गोडसे), पेडगाव विकास सेवा सोसायटी (सुखदेव केशव जगदाळे), महालक्ष्मी सहकारी पाणीपुरवठा संस्था कातरखटाव (व्यंकट विष्णू बागल), संकल्प स्वयंरोजगार संस्था, वडूज (परेश जाधव, धोंडेवाडी छावणी), विकास सेवा सोसायटी, बनपुरी (दिनकर किसन देवकर), विकास सेवा सोसायटी, एनकूळ (सुभानराव दगडू खाडे), जयभवानी विकास सेवा सोसायटी, पळसगाव (मनोज लक्ष्मण पवार), श्रीराम सहकारी दूध संस्था, कणसेवाडी (अंकुश श्रीपती खरमाटे), सोनारसिद्ध विकास सेवा सोसायटी, निमसोड (तात्याबा हणमंत मोरे, मरडवाक छावणी), पिंपळेश्‍वर सहकारी संस्था, होळीचागाव (सुखदेव पांडुरंग मोहिते) व राजीव विकास सेवा सोसायटी, पडळ (अर्जुनराव सानप) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हे दाखल झाल्यावर काहींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन तात्पुरता दिलासा मिळविल्याचे समजते. मात्र, याबाबत अनभिज्ञ असलेल्यांची तारांबळ उडाल्याचे दिसून येत आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: