Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मिलिंद एकबोटे पोलिसांसमोर हजर
ऐक्य समूह
Saturday, February 24, 2018 AT 11:24 AM (IST)
Tags: mn4
5पुणे, दि. 23 (प्रतिनिधी) : भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी दाखल गुन्ह्यात आरोपी असलेले मिलिंद एकबोटे अखेर शुक्रवारी सकाळी चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर झाले आहेत. पुणे जिल्हा ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप पाखले यांनी त्यांची कसून चौकशी केली. मिलिंद एकबोटे आज सकाळी काही कार्यकर्त्यांसह शिक्रापूर पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यानंतर त्यांची चौकशी सुरू असून याबाबत अधिक तपशील मिळू शकला नाही. दरम्यान, पुणे सत्र न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायायलाकडून अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर एकबोटे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तिथे त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने एकबोटे यांना 14 मार्चपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे.

 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: