Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कोळे येथे अनाथाश्रमावर केंद्रीय पथकाचा छापा
ऐक्य समूह
Friday, February 23, 2018 AT 10:58 AM (IST)
Tags: re2
5कराड, दि. 22 : कोळे, ता. कराड येथील जिजाऊ अनाथ मुलांच्या आश्रमावर केंद्रीय पथकाने जिल्हा बालकल्याण विभागाच्या मदतीने गुरुवारी सायंकाळी छापा टाकला. कोणतीही परवानगी व सोयीसुविधा नसताना आश्रम चालवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची सूचना केंद्रीय पथकाने केली. तेथील मुलांना ताब्यात घेऊन शासनमान्य अनाथाश्रमात पाठवण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
याबाबत मिळालेली माहिती अशी, कोळे, ता. कराड येथील जिजाऊ अनाथाश्रमावर केंद्रीय पथकाने जिल्हा बालकल्याण अधिकार्‍यांच्या उपस्थितीत गुरुवारी सायंकाळी छापा टाकला. शासनाची कोणतीही परवानगी  नसताना हा   आश्रम चालवला जात असल्याचे कागदपत्रांच्या तपासणीवरून उघड झाले. त्याचबरोबर आश्रमात आवश्यक सोयीसुविधाही नसल्याचेही समोर आले. केंद्रीय पथकाने जिल्हा बालकल्याण विभागाला संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची सूचना केली आहे. तेथील मुलांना ताब्यात घेऊन शासनमान्य अनाथाश्रमात पाठवण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: