Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कोकिसरेत गावातून बिबट्याचा फेरफटका
ऐक्य समूह
Wednesday, February 21, 2018 AT 11:01 AM (IST)
Tags: re2
5पाटण, दि. 20 : मोरगिरी भागातील कोकिसरे गावामध्ये पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेली कित्येक दिवसांपासून कोकिसरे गावाच्या आसपास बिबट्याचा वावर होता. मात्र आठवड्याभरापासून बिबट्या आता मनुष्यवस्तीत येऊ लागला आहे. रविवारी सायंकाळी 7 ते 7.30 वाजण्याच्या दरम्यान कोकिसरे गावातील मधल्या गल्लीत बिबट्याचे दर्शन झाले. नवलाईदेवी  मंदिरापासून येऊन मधल्या गल्लीने बिबट्याने आपला मोर्चा शिवाराकडे वळविला. मधल्या गल्लीतील लोकांनी प्रत्यक्ष बिबट्यास पाहिल्याने त्यांची पाचावरण धारण बसली होती. या अगोदरही बिबट्याने बर्‍याच वेळा कोकिसरेतील लोकांना दर्शन दिले होते. रविवारी सायंकाळी बिबट्याने अचानक दर्शन दिल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून लोक घराबाहेर पडण्यास भीत आहेत. सध्या आंब्याचा सिझन सुरू होत असल्याने आंब्याच्या बागेत शेतकरी  फवारणीसाठी व राखण करण्यासाठी जात असतात. बिबट्या असा दिवसा येत राहिला तर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम राहील. त्यामुळे वनविभागाने नागरिकांना योग्य खबरदारीच्या सूचना देणे
गरजेचे आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: