Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अ‍ॅपे रिक्षा उलटून बालिका ठार
ऐक्य समूह
Wednesday, February 21, 2018 AT 11:05 AM (IST)
Tags: re4
5मल्हारपेठ, दि. 20 : कराड-चिपळूण मार्गावर नवारस्ता येथील पेट्रोल पंपानजीक प्रवाशांनी भरलेली अ‍ॅपे रिक्षा उलटून सात महिन्याचे बालक व त्याची आई गंभीर जखमी झाली. उपचारा दरम्यान बालक ठार झाल्याची घटना मंगळवारी सकाळी 11 च्या सुमारास घडली. या अपघाताची नोंद मंगळवारी रात्री उशिरा पाटण पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मल्हारपेठकडून पाटणच्या दिशेने निघालेल्या अ‍ॅपे रिक्षामध्ये येराडवाडी येथे सौ. मंदा अमोल देसाई (वय 28) व त्यांची सात महिन्याची मुलगी अवनी देसाई या प्रवास करत असताना मंगळवारी सकाळी 11 च्या सुमारास नवारस्तानजीक पेट्रोल पंपाजवळ माउली धाब्याजवळ रिक्षा अचानक उलटली.
 या अपघातात रिक्षातील दोघी माय लेकी गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल केले असता तेथे अवनीचा मृत्यू झाला. अवनी ही आजारी असल्याने तिला उपचारासाठी आई सौ. मंदा या पाटण येथे नेत असताना अवनीवर काळाने घाला घातला. या अपघाताची फिर्याद सुधाकर बाबूराव देसाई (रा. येराडवाडी) यांनी मल्हारपेठ पोलीस दूरक्षेत्रात दिली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: