Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

शिर्डी येथील मॅरेथॉनमध्ये सुहास आंब्राळे द्वितीय
ऐक्य समूह
Tuesday, February 20, 2018 AT 11:06 AM (IST)
Tags: sp1
5महाबळेश्‍वर, दि. 19 : शिर्डी येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत महाबळेश्‍वर तालुक्यातील आंब्राळ गावचे सुपुत्र तसेच येथील सहाय्यक निबंधक कार्यालय येथे कामाला असलेले सुहास आंब्राळे यांनी 10 कि. मी. धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकवला. या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेमध्ये  सातारा जिल्ह्यातील स्पर्धकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात भाग घेतला होता.
सुहास आंब्राळेे यांनी 10 कि.मी. धावण्याच्या मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर केवळ 39 मि. 28 सेकंदात पूर्ण करून द्वितीय क्रमांक पटकावला. सुहास आंब्राळेे यांनी या पूर्वी गोवा येथे झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत 21 कि. मी. चे अंतर 1 तास 34 मिनिटात पूर्ण करून चौथा क्रमांक मिळवला होता तर सातारा हिल मॅरेथॉनचे अंतर 1 तास 35 मिनिटात पूर्ण करून तृतीय क्रमांक मिळवला होता. मुंबई येथील टाटांच्या मॅरेथॉनचे 42 कि. मी. चे अंतर सुद्धा पूर्ण केले होते. भारतातील विविध ठिकाणी झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत त्यांनी भाग घेऊन पारितोषिके मिळवलेली आहेत. सुहास आंब्राळेे यांनी सहकार क्षेत्रात काम करताना धावण्याचा छंद जोपासला आहे.  ते दररोज नित्यनियमाने 1 ते 2 तास धावण्याचा सराव करतात तर नियमित व्यायाम सुद्धा करतात. त्यांना आतापर्यंत त्यांच्या मित्रांनी तसेच त्यांच्या सहकर्‍यांनी मदत केली आहे. त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: