Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा
ऐक्य समूह
Tuesday, February 20, 2018 AT 11:00 AM (IST)
Tags: re2
5रहिमतपूर, दि. 19 : एका महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी रहिमतपूर येथील अंकुश राजाराम जाधव याच्यावर आणि शिवीगाळ व मारहाण केल्या प्रकरणी उषा उर्फ जनाबाई अंकुश जाधव हिच्यावर रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित महिला सोमवारी सकाळी 6.45 च्या सुमारास कळकाचे हार व  टोपल्या विणत बसल्या असता, अंकुश जाधवने गाडीवरून येऊन तिच्याकडे वाईट नजरेने बघून शिवीगाळ केली. त्याने पीडितेच्या अंगावर धावून जात विनयभंग केला. त्याची पत्नी उषा उर्फ जनाबाई जाधव हिने पीडितेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी पीडितेने फिर्याद दाखल केली असून पोलीस नाईक संतोष नाळे तपास करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: