Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

अजय दडस यांची ‘कॉम्बॅट 360’ साठी निवड
ऐक्य समूह
Tuesday, February 20, 2018 AT 11:07 AM (IST)
Tags: sp2
5बिदाल, दि. 19 (आकाश दडस) : महाराष्ट्र फायर सर्व्हिसेस पर्सोनेल वेल्फेअरच्यावतीने ‘कॉम्बॅट 360’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे भारतात पहिल्यांदाच आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये माण तालुक्यातील पांगरी येथील अजय विष्णू दडस यांची निवड झाली आहे.
अजयचे आई-वडील मेंढपाळ व्यवसाय करतात. घरची गरिबी असूनही अजय याने जिद्दीने शिक्षण घेतले. प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन तो अग्निशमन दलामध्ये भरती झाला. त्याच्या या यशात आई-वडील, नातेवाईक, घारेवाडी येथील शिवम् प्रतिष्ठान कराड येथील विद्या प्रबोधिनीचा मोलाचा वाटा आहे. अजयचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पांगरीतील बिरोबा विद्यालयात झाले तर त्याने महाविद्यालयीन शिक्षण दहिवडी येथील दहिवडी कॉलेज व सातारा येथील शिवाजी कॉलेजमधून पूर्ण केले. शिवम; प्रतिष्ठान व विद्या प्रबोधिनी अ‍ॅकॅडमीमध्ये त्याने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला. मागील वर्षी अग्निशमन दलाच्या निवड प्रकियेत सब ऑफिसर म्हणून त्याची निवड झाली.
गेल्या काही दिवसांपासून देशाच्या आर्थिक राजधानीत आगीच्या घटनांमध्ये जीवाची बाजी लावणार्‍या मुंबई अग्निशमन दलाचे जवान येत्या 8 ते 10 मार्च दरम्यान गोरेगाव येथील एनएससीआय येथे होणार्‍या ‘फायर फायटर कॉम्बॅट 360’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार असून त्यामध्ये अजय दडस याचा समावेश आहे. सध्या तो महाराष्ट्र अग्निशमन प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण घेत आहेत. ब्रिटनचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक मायकेल जोसेफ हे या जवानांना प्रशिक्षण देत आहेत. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक, सहकार, आर्थिक, साहित्यिक क्षेत्रातील मान्यवरांनी या निवडीबद्दल अजयचे अभिनंदन केले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: