Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
नीरव मोदी, मेहुल चोक्सीचे पासपोर्ट रद्द
ऐक्य समूह
Saturday, February 17, 2018 AT 11:05 AM (IST)
Tags: na3
5नवी दिल्ली, दि. 16 (वृत्तसंस्था) : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या मुसक्या आवळण्याचे प्रयत्न केंद्र सरकारने सुरू केले आहेत. ईडीच्या विनंतीवरून परराष्ट्र मंत्रालयाने दोघांचेही पासपोर्ट रद्द केले आहेत.
नीरव दीपक मोदी आणि मेहुल चिनूभाई चोक्सी यांचे पासपोर्ट तत्काळ निलंबित करण्यात आले आहेत. पुढील चार आठवड्यांच्या कालावधीसाठी हे पासपोर्ट वैध नसतील. अंमलबजावणी संचलनालयाच्या विनंतीनंतर ही कारवाई केल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली.
नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी आपले पासपोर्ट का जप्त केले जाऊ नयेत, याचं उत्तर एक आठवड्याच्या आत देण्याचे आदेश दिले आहेत. या कालावधीत त्यांनी उत्तर न दिल्यास परराष्ट्र मंत्रालय आपला निर्णय कायम राखत पासपोर्ट रद्द करेल.  
नीरव मोदी परदेशात
नीरव मोदी बेल्जियममध्ये पळून गेल्याची माहिती आहे. नीरव मोदी हा भारतातील मोठा हिरे व्यापारी आहे. त्याला भारतातील ’डायमंड किंग’ असंही संबोधलं जातं.
नीरव मोदीने ’नीरव मोदी डायमंड ब्रँड’ या नावाने भारतासह जगभरात ज्वेलरी शोरूम सुरू केली आहेत. दिल्ली, मुंबईपासून ते लंडन, हाँगकाँग आणि न्यूयॉर्कपर्यंत नीरव मोदीची 25 लक्झरी स्टोअर्स आहेत.
नीरव मोदीच्या मालकीच्या 18 ठिकाणांवर छापे टाकून ईडीने 5 हजार 100 कोटींचे हिरे जप्त केले आहेत. जप्त केलेल्या हिर्‍यांची किंमत 5 हजार 100 कोटी रुपये इतकी असल्याची माहिती आहे. धाड टाकलेल्या ठिकाणांमध्ये गीतांजली शोरूम्ससह अन्य ठिकाणांचा समावेश आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: