Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्याला अटक
ऐक्य समूह
Thursday, February 15, 2018 AT 11:16 AM (IST)
Tags: na4
5नवी दिल्ली, दि. 14 (वृत्तसंस्था) : इंडियन मुजाहिद्दीनचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अरिज खान उर्फ जुनैद याला दिल्ली पोलिसांनी बुधवारी अटक केली. 2008 पासून फरार असलेला जुनैद बॉम्बस्फोट प्रकरणात पोलिसांना हवा होता.
जुनैद उत्तर प्रदेशातील आझमगढ येथील रहिवासी आहे. 19 सप्टेंबर 2008 रोजी जामियानगर परिसरातील बाटला हाऊसमध्ये झालेल्या चकमकीदरम्यान तो पोलिसांच्या तावडीतून निसटला होता. त्याला पकडण्यासाठी 15 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. या चकमकीत इंडियन मुजाहिद्दीनच्या दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते तसेच अतिरेक्यांशी लढताना पोलीस निरीक्षक मोहनचंद शर्मा हे शहीद झाले होते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: