Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू घडण्यासाठी प्रयत्न करावेत : राजेंद्र राजपुरे
ऐक्य समूह
Thursday, February 15, 2018 AT 11:23 AM (IST)
Tags: sp1
5पाचगणी, दि. 14 : कबड्डी हा रागंड्या मातीतील खेळ. प्रोफेशनल कबड्डीमुळे या खेळाची लोकप्रियता वाढली आहे. त्यामुळे स्पर्धा रंगतदार होत आहेत. या स्पर्धांमधून आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू घडण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे यांनी केले.
गोडवली, ता. महाबळेश्‍वर येथील तपनेश्‍वर सेवा मंडळाच्यावतीने नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त झालेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी ते बोलत होते. उद्योजक सलीम मोघल, सरपंच सुरेश मालुसरे, अंकुश मालुसरे, सचिन मालुसरे, तुकाराम मालुसरे, रमेश देवघरे उपस्थित होते.
50 किलो वजनी गटाच्या स्पर्धेत सातारच्या श्रीकृष्ण क्रीडा मंडळाने विजेतेपद तर पाचगणी विभाग संघाने उपविजेतेपद पटकावले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. आबा मालुसरे यांनी प्रास्ताविक केले.
योगेश मालुसरे यांनी आभारं मानले. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी मंडळाचे अध्यक्ष योगेश मालुसरे, सुरेश विष्णू मालुसरे, अजित मालुसरे, दीपक मालुसरे, मारुती मालुसरे, आनंद मालुसरे, सर्जेराव मालुसरे यांनी प्रयत्न केले. मंडळाचे पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: