Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
वादग्रस्त सल्ला देणारे मौलाना निलंबित
ऐक्य समूह
Monday, February 12, 2018 AT 11:04 AM (IST)
Tags: na2
5नवी दिल्ली, दि. 11 (वृत्तसंस्था) : अयोध्यात राम मंदिर उभारण्यासंबंधी दिलेला वादग्रस्त सल्ला मौलाना सय्यद सलमान हुसैनी नदवी यांना चांगलाच महागात पडला आहे. वादग्रस्त सल्ल्यानंतर मौलाना नदवी यांची ‘ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड’च्या सदस्यपदावरून हकालपट्टी  करण्यात आली आहे. मौलाना नदवी यांनी काही दिवसांपूर्वी अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्यासोबत बेंगळुरूमध्ये बैठक घेऊन अयोध्याचा वाद मिटवण्यासाठी अजब पर्याय सुचवले होते. अयोध्याच्या वादावर मौलाना नदवी यांनी वादग्रस्त सल्ला दिल्यानंतर ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने नाराजी व्यक्त केली होती. तसेच त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी 4 सदस्यीय समितीचे गठन केले होते. खचझङइ ने शुक्रवारी हैद्राबादमध्ये बोर्डाच्या बैठकीत नदवी यांचा सल्ला फेटाळून लावत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.
खचझङइ चे सदस्य कासिम इलयास यांनी मौलाना नदवी यांची हकालपट्टी केल्याची माहिती दिली. ‘ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड’ आपल्या जुन्या वक्तव्यावर ठाम असून मशिद ही भेट म्हणून देता येणार नाही. तसेच ती विकता येणार नाही किंवा त्या जागेवरून हलवली जाऊ शकत नाही, असे असताना मौलाना नदवी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांनी दिलेल्या सल्ल्याची मुस्लीम बोर्डाने गंभीर दखल घेतली असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येत असल्याची माहिती कासिम यांनी दिली. अयोध्या वाद मिटवण्यासाठी मी प्रयत्न सुरूच ठेवणार आहे, असे मौलाना नदवी यांनी खचझङइ च्या कारवाईपूर्वी सांगितले. श्री श्री रविशंकर आणि मौलाना नदवी यांच्यासह हिंदू-मुस्लीम समाजातील लोकांसोबत झालेल्या बैठकीत तीन सल्ले देण्यात आले होते. रामलल्लाचा फोटो आहे त्या ठिकाणी राममंदिर बांधण्यात यावे. वादग्रस्त जागेवरील दावा मुस्लीम सोडून देतील व अन्य धार्मिक स्थळावर हिंदू आपला दावा सांगणार नाहीत. मशिद दुसर्‍या ठिकाणी बांधली जाईल. अयोध्या-गोरखपूर महामार्गावर बहादूर शाह जफरच्या नावाने एक आंतरराष्ट्रीय इस्लामिक विद्यापीठ बांधून त्या परिसरात मशिद बांधली जाईल. निर्मोही आखाड्याची जमीन मुस्लिमांना देण्यात यावी. तसेच वादग्रस्त जागेवर भगवान रामाची मूर्ती आहे त्या ठिकाणी मंदिर बांधून युसूफ आरा मशीनच्याजवळ मशिद बांधण्यात यावी, असे सल्ले देण्यात आले होते. दरम्यान, अयोध्या वादावर सर्वोच्च न्यायालयात दि. 14 मार्च रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
  
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: