Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘शांतिदूत’ प्रकरणी भूमिका ठरवण्यासाठी सुरेश खोपडे आज सातार्‍यात
ऐक्य समूह
Monday, February 12, 2018 AT 10:55 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 11 : पोलीस मुख्यालयासमोरील शांतिदूताचा पुतळा हटवल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद सातार्‍यात उमटले होते. या घटनेनंतर सातार्‍यात येणार असल्याचे पुतळ्याचे शिल्पकार निवृत्त पोलीस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी जाहीर केले होते. त्यानुसार खोपडे सोमवारी सातार्‍यात येणार आहेत.  
सातारा पोलीस मुख्यालयासमोरील शांतिदूताचे प्रतीक असणारा कबुतराचा पुतळा पोलीस प्रशासनाने गुरुवारी रात्री जेसीबी लावून काढला. मध्यरात्री घडलेल्या या घटनेने सातार्‍यात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस मुख्यालयासमोरील असणारे हे वैभव अचानक पोलीस काढू लागल्यानंतर सातार्‍यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यावेळी आंदोलनही केले. मात्र पोलिसी बळ वापरत आंदोलन हाणून पाडण्यात आले. पुतळा काढण्यासाठी रात्री आठ वाजता सुरु झालेली मोहीम साडेबारा वाजता थांबली.
दुसर्‍या दिवशी सातारकरांना या घटनेची माहिती समजल्यानंतर त्याबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. 2000 साली हा शांतिदूत मुख्यालयासमोर होता.    
सातारकरांप्रमाणेच पोलीस कर्मचार्‍यांचेही त्याच्याशी भावनिक नाते तयार झाले होते. पोलीस अधिकार्‍यांच्या या कृतीचा जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून निषेधही नोंदवण्यात आला.  या घटनेनंतर प्रथमच खोपडे सोमवारी सातार्‍यात येणार आहेत. सर्वप्रथम ते पुतळ्याबाबतची सविस्तर माहिती घेवून लोकभावना जाणून घेणार आहेत. लोकभावनेतून जो अंतिम निर्णय येईल त्यानुसार पुढील भूमिका स्पष्ट करणार आहेत.
  
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: