Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
फेसबुकवर महिलेचे बनावट अकौंट उघडणार्‍या महिलेवरच गुन्हा दाखल
ऐक्य समूह
Thursday, February 08, 2018 AT 11:02 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 7 : फेसबुकवर सातार्‍यातील एका महिलेचे बनावट अकाउंट काढून, त्यावर  अश्‍लील संवाद साधून बदनामी केल्या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेतील धक्कादायक बाब म्हणजे हा प्रकार एका महिलेनेच केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. रूपाली मयेकर असे संशयित महिलेचे नाव आहे. मात्र हे अकाउंट संशयित महिलेनेच काढले आहे की अन्य कोणी याचा तपास केला जात आहे.
 याबाबत शहर पोलीस ठाण्यात 31 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे.  तक्रारीत म्हटले आहे, की दि. 18 ते 30 डिसेंबर 2017 या कालावधीत  तक्रारदार महिलेला  फोनवर अनेक अनोळखी व्यक्तींचे फोन येत होते. फोनद्वारे बोलणारी व्यक्ती ‘तुम्हीच फोन करायला सांगितले आहे,’ असे सांगायची. हे फोन रात्री, अपरात्री जादा प्रमाणात येत होते. तक्रारदार महिलेने फोनवरील व्यक्तीला मोबाईल नंबरबाबत विचारल्यानंतर ‘फेसबुकवर तुम्हीच चॅटिंग करून दिला’ असल्याचे समोरून सांगितले जात होते.
तक्रारदार महिलेने त्रासाला कंटाळून फेसबुक अकाउंट तत्काळ बंद केले. मात्र तरीही फोन येण्याचे प्रकार थांबत नव्हते. अखेर त्या महिलेने तक्रार दिली. त्यानंतर सातारा सायबर सेल पोलीस ठाण्याने तपास केला.  
प्राथिमक तपासामध्ये  बनावट अकाउंट काढल्याचे समोर आले. संबंधित बनावट अकाउंट रूपाली मयेकर या महिलेने काढले असल्याचे समोर आल्याने  तिच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
    
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: