Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
ग्रामपंचायत निवडणुकीवरून फिल्मी स्टाईलने दोघांना मारले
ऐक्य समूह
Thursday, February 08, 2018 AT 11:05 AM (IST)
Tags: lo3
5सातारा, दि. 7 : कारी ग्रामपंचायतीची निवडणूक असल्याने अर्जाबाबत माहिती घेण्यासाठी तहसील कार्यालयात दोन तरुण आले होते. तेथून ते मंगळवारी दुपारी अडीच ते पावणे तीनच्या सुमारास नाष्टा करण्यासाठी  सेव्हन स्टार इमारतीसमोरील हेरंब वडापाव येथे गेले. तेथे नाष्टा करत असताना चार अनोळखी तरुणांनी हातातील दांडक्याने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यामध्ये ते दोघे जखमी झाले आहे.  या प्रकरणी अज्ञात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सातारातालुक्यातील कारी ग्रामपंचा-यतीची निवडणूक लागली आहे.अर्ज भरण्याची मुदत दि. 10 पर्यंतअसल्याने गावातील तरुण व राजकारणी मंडळी तहसील कार्या-लयात निवडणूक  शाखेत अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने गर्दी करत आहेत. अर्जाबाबत माहिती घेण्यासाठी कारी येथून अरुण गजानन मोरे (वय 34) व सागर दिलीप अडागळे (़वय 22) हे दोघेही आले होते. मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास तहसील कार्यालयातून ते पाठीमागच्या रस्त्याने सेव्हन स्टार बिल्िंडगच्या समोर वडापाव खाण्याच्या निमित्ताने गेले. हेरंब वडा पाव स्टॉलवर ते दोघे वडापाव खात होते. अचानक चार तरुण तोंडाला रूमाल बांधलेल्या अवस्थेत आले. त्यांच्या हातात दांडकी होती. त्यांनी काही कळायच्या आतमध्ये दोघांवर अचानक हल्ला चढवला. अरुण  यांच्या डोऴ्यावर तर सागर यांच्या डोक्यात मार बसला. त्यांनी आरडाओरडा करून प्रतिकार केला. त्यानंतर ते चौघे पळून गेले. मात्र या प्रकारामध्ये हातातील पितळीची अंगठी आणि 1700 रुपयांचा मोबाईल गेला. याबाबतची फिर्याद सातारा शहर पोलिसात दिली असून अज्ञात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. हवालदार एस.टी.माने तपास करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: