Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुलीची छेड काढून कुटुंबीयांना तलवारीने धमकावणार्‍यावर गुन्हा
ऐक्य समूह
Thursday, February 08, 2018 AT 11:06 AM (IST)
Tags: lo4
5सातारा, दि. 7 : अल्पवयीन मुलीची छेड का काढतोस, असे विचारणार्‍या कुटुंबीयांना तलवारीचा धाक दाखवणार्‍या आकाश जाधव (वय 20) याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, घटनेतील मुलगी ही शाळेत शिक्षण घेत आहे. मंगळवारी शाळा सुटल्यानंतर ती घरी जात असताना संशयिताने मुलीची छेड काढली.
संशयित गेली अनेक दिवस मुलीची छेड काढून तिला त्रास देत होता. मुलीने या घटनेची माहिती कुटुंबीयांना सांगितल्यानंतर संशयिताने दहशत माजवत मुलीच्या घरी जावून, सर्वांना तलवार दाखवून शिवीगाळ, दमदाटी केली. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: