Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पंतप्रधान मोदी यांच्या पत्नी अपघातात जखमी
ऐक्य समूह
Thursday, February 08, 2018 AT 11:00 AM (IST)
Tags: mn2
5जयपूर, दि. 7 (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन यांच्या कारला भीषण अपघात झाला असून त्यात त्या जखमी झाल्या आहेत. जशोदाबेन यांच्या डोक्याला मार लागला आहे. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक नसल्याचे त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी सांगितले. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
जशोदाबेन राजस्थानातील चितोडगडला एका कार्यक्रमासाठी जात होत्या. यावेळी त्यांना अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की त्यात जशोदाबेन यांच्या कारचा चक्काचूर झाला. त्यात एक जण ठार झाला. अपघातानंतर स्थानिकांनी त्यांना लगेचच चितोडगड रुग्णालयात दाखल केले.  

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: