Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
तैवानमध्ये 6.4 तीव्रतेचा भूकंप
ऐक्य समूह
Thursday, February 08, 2018 AT 11:07 AM (IST)
Tags: mn3
5तैपाई, दि. 7 (वृत्तसंस्था) : तैवानच्या ईस्टर्न भागात मंगळवारी रात्री उशिरा भूकंपाचे धक्के बसले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.4 मॅग्निट्यूड एवढी मोजली गेली आहे. भूकंपाची तीव्रता एवढी होती, की अनेक इमारती कोसळल्या. यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला असून 225 लोक जखमी झाले आहेत. 145 लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे. अनेक घरे कोसळली आहेत. स्थानिक वेळेनुसार रात्री 11.50 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले.
अमेरिकन जिओग्राफिकल सर्वेने दिलेल्या आकडेवारीनुसार रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 6.4 नोंदवली गेली आहे. याचे केंद्र बंदराचे शहर हुआलिएनपासून 21 किलोमीटर अंतरावर जमिनीपासून आत 9.5 किलोमीटर होते. भूकंपाने हुआलिएन शहरातील मार्शल हॉटेलच्या 10 मजली बिल्डिंगचे ग्राऊंड फ्लोअर पडले. मीडिया रिपोर्टनुसार या बिल्डिंगच्या ढिगार्‍याखाली 30 लोक अडकले असण्याची शक्यता आहे. 
समुद्रकिनार्‍यावर वसलेले तैवानचे हुआलिएन शहर हे प्रसिद्ध टुरिस्ट स्पॉट आहे. या शहराची लोकसंख्या 1 लाखांच्या आसपास आहे. तैवान प्रेसिडेंट ऑफिसने जारी केलेल्या निवेदनानुसार तैवानचे राष्ट्राध्यक्ष साई इंग वेन यांनी कॅबिनेट आणि संबंधित मंत्रालयाला बचाव कार्य आणि मदत तातडीने पोहोचवण्याचे आदेश दिले आहेत.
रविवारपासून भूकंपाचे 100 धक्के
या भागात रविवारपासून भूकंपाचे 100 धक्के जाणवले आहेत. मात्र त्सुनामीचा इशारा दिलेला नाही. तैवानमधील तैइनान येथे दोन वर्षांपूर्वी एवढ्याच तीव्रतेचा भूकंप आला होता. त्यात 100 जणांचा मृत्यू झाला होता. 1999 मध्ये 7.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप आला होता. त्यामध्ये 2400 लोक मृत्युमुखी पडले होते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: