Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
डेहराडून: बनावट चकमक प्रकरणी सात पोलिसांना जन्मठेप
ऐक्य समूह
Wednesday, February 07, 2018 AT 11:03 AM (IST)
Tags: na1
5नवी दिल्ली, दि. 6 (वृत्तसंस्था) : बनावट चकमकीत एका युवकाला मारल्याच्या आरोपावरून निलंबित केलेल्या दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी सात पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यातील अन्य दहा निलंबित आरोपीच्या शिक्षेचा निर्णय प्रलंबित ठेवला आहे.
डेहराडून येथे जुलै 2009 मध्ये पोलिसांनी बनावट चकमक घडवून रणबीर सिंग (वय 22) या व्यवस्थापनशास्त्राच्या विद्यार्थ्याची हत्या केली होती. या प्रकरणी न्या. एस. मुरलीधर आणि न्या. आय. एस. मेहता यांच्या खंडपीठाने कनिष्ठ न्यायालयाने सात निलंबित पोलिसांच्या खटल्यावर 2014 मध्ये दिलेला निकाल कायम ठेवला. पोलिसांनी आपली बाजू मांडताना न्यायालयात सांगितले होते, की रणबीर सिंग व अन्य दोघे जण दरोडा घालण्याच्या तयारीत होते.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: