Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जीवे मारण्याचीधमकी देवून युवतीवर बलात्कार
ऐक्य समूह
Wednesday, February 07, 2018 AT 10:58 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 6 :   जीवे मारण्याची धमकी देवून 18 वर्षीय मुलीवर  वेळोवेळी 2014 पासून बलात्कार करणार्‍या सुरेश (रा.कोरेगाव, पूर्ण नाव, वय माहीत नाही) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  धक्कादायक बाब म्हणजे सुरेश हा पीडित मुलीच्या वडिलांचा मित्र होता. या घटनेतील पीडित मुलगी गर्भवती आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, या प्रकरणी पीडित मुलीनेच सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पीडित मुलगी ही सातारा शहरालगत तिच्या आई, वडिलांसोबत राहत आहे. पीडित मुलीचे वडील व संशयित सुरेश हे मित्र आहेत. संशयित हा 2014 मध्ये घरी जेवणासाठी आला होता त्यावेळी दारूही पिला होता. घरी जेवल्यानंतर दुसर्‍या दिवशी संशयित कोणी नसताना घरी गेला व मुलीवर अत्याचार केले. अत्याचार केल्यानंतर याबाबत कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी  त्याने तिला दिली. घाबरलेल्या युवतीने वडिलांना त्याबाबतची माहिती दिली. मात्र वडिलांनीही याबाबत वाच्यता न करण्यास बजावले. काही कालावधी गेल्यानंतर पुन्हा संशयिताने घरी जावून मुलीवर अत्याचार केले. वारंवार हा प्रकार होत असताना   जीवे मारण्याची धमकी देवून युवतीवर बलात्कार
मुलीने घरी वडिलांना माहिती दिली. मात्र त्यांनी बदनामी होईल या भीतीने कुठेही वाच्यता न करण्यास बजावले. काही कालावधीनंतर मुलीला चक्कर आल्याने दवाखान्यात दाखवल्यानंतर ती गर्भवती असल्याचे समोर आले. यावेळी मुलीच्या वडिलांनी मुलीला व तिच्या आईला घरातून निघून जाण्यास सांगितले. मुलगी व तिची आई रेल्वेने सांगली येथे गेले व सुमारे चार दिवस राहिल्यानंतर पुन्हा ते सातारा येथे आले. सातारा येथे आल्यानंतर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: