Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
नायजेरियात अपहृत जहाजाची सुटका
ऐक्य समूह
Wednesday, February 07, 2018 AT 11:04 AM (IST)
Tags: na2
5नवी दिल्ली, दि. 6 (वृत्तसंस्था) : पश्‍चिम आफ्रिकेच्या बेनिन समुद्र किनार्‍यावरून अपहरण झालेल्या जहाजाची आज अखेर सुखरूप सुटका झाली. या जहाजावर असलेले सर्व 22 भारतीय कर्मचारी सुखरूप आहेत. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विट करून त्याबद्दलची माहिती दिली.
एमटी मरिन एक्स्प्रेस नावाचे हे जहाज गॅसऑइल वाहून नेत होते. रविवारी हे जहाज बेनिनच्या समुद्रात गायब झाले. जहाजाचा संपर्क तुटला तेव्हा हे जहाज बेनिनच्या कोटोनाऊ येथे होते. त्यामुळे बेनिन आणि नायजेरियनच्या अधिकार्‍यांना त्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आणि तटरक्षक दलानेही त्या जहाजाचा शोध सुरू केला. 22 कर्मचार्‍यांना घेऊन जाणार्‍या या जहाजाची सुटका झाली असून हे सांगताना मला अभिमान होत आहे. नायजेरिया आणि बेनिन सरकारने मदत आणि सहकार्य केल्यामुळे आम्ही त्यांचे आभार मानतो, असं ट्विट सुषमा स्वराज यांनी केलं आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: