Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
फलटण येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
ऐक्य समूह
Wednesday, February 07, 2018 AT 11:03 AM (IST)
Tags: re3
5फलटण, दि. 6 : जुना महाड-पंढरपूर राज्य मार्ग आणि नवीन आळंदी-मोहोळ राष्ट्रीय महामार्गावर फलटण शहरातून जाणार्‍या नीरा उजवा कालव्यावरील पुलावर मंगळवारी रात्री 8 च्या सुमारास भरधाव अज्ञात वाहन आणि दुचाकीचा अपघात होऊन दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. अपघातानंतर चालक वाहनासह पसार झाला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सचिन खोमणे (वय 35, रा.उमाजी नाईक चौक, फलटण) हा आपल्या दुचाकीवरून (क्र. एम. एच. 11 एक्यू 6837) जात असताना नीरा उजवा कालव्यावरील पुलावर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर अज्ञात वाहनाने दुचाकी फरफटत नेली. अपघातानंतर चालक वाहनासह घटनास्थळावरून पळून गेला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: