Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘आयटीडी’च्या बेकायदा उत्खननाच्या चौकशीचे आदेश
ऐक्य समूह
Wednesday, February 07, 2018 AT 11:07 AM (IST)
Tags: re4
अहवाल सादर करण्याची तहसीलदारांची सूचना
5शेंद्रे, दि. 6 : भाटमरळी, ता. सातारा येथे आयटीडी सिमेंटेशन इंडिया कंपनीकडून प्रमाणापेक्षा जास्त झालेल्या माती व मुरूम उत्खननाची दखल घेऊन या प्रकरणी तत्काळ चौकशी करण्याचे आदेश तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी मंगळवारी दिले आहेत. चौकशी अहवाल मिळाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे काम रिलायन्स कंपनीकडे आहे. या कंपनीची आयटीडी सिमेंटेशन इंडिया कंपनी ही ठेकेदार कंपनी असून वाढे फाटा येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या भरावासाठी आयटीडी कंपनीकडून भाटमरळी येथून मुरूम व माती उत्खनन करून पुरवण्यात येत आहे. आयटीडी कंपनीने परवानगीपेक्षा जास्त प्रमाणात मुरूम उचलून शासनाचा सुमारे 70 लाख रुपयांहून अधिक रकमेचा महसूल बुडवल्याचे दैनिक ‘ऐक्य’ने मंगळवार, दि. 6 च्या अंकात प्रसिद्ध केल्यानंतर महसूल विभागात खळबळ उडाली. या वृत्ताची दखल तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी तत्काळ दखल घेऊन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.  
आयटीडी सिमेंटेशन इंडिया कंपनीने भाटमरळी येथे केलेल्या उत्खननाची चौकशी करुन अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. अहवालात कंपनी दोषी आढळल्यास कायद्यानुसार कारवाई केली जाईल. महसूल विभागाने दिलेल्या अहवालाबाबत कोणी शंका व्यक्त केल्यास त्रयस्थ संस्थेमार्फत पुन्हा पारदर्शक चौकशी करण्यात येईल. विजेच्या खांबांच्या नुकसानीबाबत आणि संभाव्य धोक्यांबाबत वीज वितरण कंपनीला सूचना देण्यात आल्या असून त्यांनाही कारवाई करण्यास सांगितले आहे, असे नीलप्रसाद चव्हाण यांनी सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: