Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
बिल्डर डीएसकेंना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
ऐक्य समूह
Tuesday, February 06, 2018 AT 11:04 AM (IST)
Tags: mn4
5मुंबई, दि. 5 (प्रतिनिधी) : पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना 50 कोटी रुपये न्यायालयात भरण्यास पुन्हा एकदा अपयश आले. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने कडक शब्दात खडसावत डीएसकेंना मंगळवारी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. डीएसकेंच्या वकिलांनी न्यायालयाकडे आणखी वेळ मागितली आहे. डीएसकेंच्या अटकपूर्व जामिनावर सोमवारी सुनावणी झाली. आंतरराष्ट्रीय बँकांनी मागितलेल्या कागदपत्रांची पूर्तता अजून झालेली नाही.
डीएसकेंना न्यायालयाचा प्रश्‍न
ऑडिट रिपोर्टचीही पूर्तता अजून झालेली नाही.  
त्यामुळे मालमत्तांचा लिलाव का करत नाही, असा सवाल न्यायालयाने डीएसकेंना विचारलाय तसेच डीएसके न्यायालयाची फसवणूक करत असल्याचं सांगत न्यायालयाने डीएसकेंच्या वकिलांना फटकारले.
चौकशीसाठी रहावे लागणार हजर
डीएसके यांना 7 ते 11 फेब्रुवारीपर्यंत सकाळी 11 ते 1 आणि दुपारी 3 ते 5 या वेळेत पुण्यात आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे. या बरोबरच येत्या 13 फेब्रुवारीला डीएसके यांना मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीस हजर रहावे लागणार आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: