Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शेतकर्‍यांची सगळी तूर खरेदी करणार सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही
ऐक्य समूह
Tuesday, February 06, 2018 AT 11:01 AM (IST)
Tags: mn2
5औरंगाबाद, दि. 5 (वृत्तसंस्था) : शासनाच्या त्या पत्रामुळे कदाचित गोंधळ झाला असावा. मात्र शेतकर्‍यांकडून सगळी तूर खरेदी केली जाईल, असे स्पष्टीकरण राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. ते औरंगाबाद येथे बोलत होते.  
तूर खरेदीबाबत फतवा
तूर खरेदीचा गोंधळ संपता संपत नाही. आधी तूर खरेदी केंद्र सुरू कधी होणार हा गोंधळ तर आता शेतकर्‍यांकडून प्रति एकर फक्त 2 क्विंटल तूर खरेदी करणारा नवा फतवा आला आहे. त्यामुळे शेतकरी हैराण झाला आहे.
इतक्याच तुरीला हमीभाव
शासन नियमानुसार औरंगा-बादेत एकरी   2 क्विंटल तूरच शासनाच्या तूर खरेदी केंद्रावर हमी भावात विकत घेतली जाणार आहे. एका एकरमध्ये जवळपास 8 ते 10 क्विंटल तूर उत्पादन होते. मात्र शासन 2 क्विंटलच खरेदी करणार असल्याने शेतकरी पुन्हा हवालदिल झाला. उरलेल्या तुरीचे काय करावे, असा प्रश्‍न शेतकर्‍यांना पडला आहे.


© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: