Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सीरियात बंडखोरांनी रशियाचे लढाऊ विमान पाडले
ऐक्य समूह
Monday, February 05, 2018 AT 11:13 AM (IST)
Tags: na2
5इस्तंबूल, दि. 4 (वृत्तसंस्था) : हयात ताहरीर अल-शाम या दहशतवादी संघटनेने रशियाचे सुखोई-25 हे लढाऊ विमान पाडल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे.
विमान पाडण्यात आलेल्या भागावर बंडखोरांचे वर्चस्व आहे. रशियाच्या शक्तिशाली हवाई दलाचा पाठिंबा मिळाल्याने सीरियातील  बाशर अल असद यांच्या सरकारने इडलिब येथील बंडखोरांविरोधात डिसेंबर महिन्यात मोठी मोहीम उघडली होती. हयात ताहरीर अल-शाम ही संघटना पूर्वीच्या अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे. वैमानिकाने विमानातून बाहेर आल्यावर गोळीबार केला, पण बंडखोरांनी त्याला पकडून त्याची हत्या केली, अशा माहिती रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिली.
 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: