Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
उत्तर तांबवे येथे युवकाची गळफास घेवून आत्महत्या
ऐक्य समूह
Monday, February 05, 2018 AT 11:28 AM (IST)
Tags: re2
5कराड, दि. 4 : उत्तर तांबवे, ता. कराड येथील सुनील व्यंकट जाधव (वय 24) याने गावातील एका पडक्या घरात काही दिवसांपूर्वी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली. आठ दिवसांपूर्वी जेवण तो करुन घराबाहेर पडला होता, त्यानंतर त्याचा मृतदेह सडलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला आहे. या घटनेची नोंद कराड तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, उत्तर तांबवे, ता. कराड येथील सुनील व्यंकट जाधव (वय 24) हा काही महिन्यांपासून  पुणे येथे एका खासगी कंपनीमध्ये कामाला जात होता. त्याचा स्वभाव अबोल होता. तो कामाला जाणे व कामावरुन येणे याबाबत घरी सांगत नव्हता. गावाकडे आल्यावर तो दिवसभर बाहेर असायचा व रात्री उशिरा घरी येवून जेवण झाल्यानंतर परत घराबाहेर जात होता. सुनील जाधव हा नेहमी घरापासून काही अतंरावरच असलेल्या डॉ. हणमंत पाटील यांच्या पडक्या घरात झोपत होता. या घराला बाहेरून कुलूप असल्याने त्याने या घराच्या पाठीमागील भिंतीला ये-जा करण्यासाठी भगदाडही पाडले आहे. सुनील हा 15 दिवसांपूर्वी गावी आला होता. त्यानंतर आठ दिवसांपूर्वी तो जेवण करुन घराबाहेर पडला होता. तो परत आला नसल्याने तो पुणे येथे पुन्हा कामाला गेला असेल, असे समजून नातेवाईकांनी दुर्लक्ष केले. दरम्यान, शनिवारी डॉ. हणमंत पाटील यांच्या पडक्या घरातून वास येत असल्याने ग्रामस्थांनी पाहणी केली असता तेथे गळफास घेतलेल्या स्थितीत त्याचा मृतदेह दिसून आला.              
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: