Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शासनाची फसवणूक करणार्‍या दोघांना पोलीस कोठडी
vasudeo kulkarni
Monday, February 05, 2018 AT 11:16 AM (IST)
Tags: re1
5कराड, दि. 4 : शासनाचे अनुदान लाटण्यासाठीच जैविक कोळसा उत्पादनाच्या नावाखाली प्रतीक इंडस्ट्रियल को-ऑपरेटिव्ह सोसायटी ओगलेवाडी, ता. कराड या नावाने बोगस सहकारी संस्था स्थापन केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी कराड शहर पोलिसांनी अटक केलेल्या बोगस संस्थेचा चेअरमन संतोष कृष्णत लाड (वय 30 वर्षे), रा. कराड व सचिव गणेश नाना साळुंखे (वय 35 वर्षे), रा. मानकापूर, ता. चिकुडी, जि. बेळगाव या दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता बुधवार, दि. 7 पर्यंत 4  दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
काही युवकांनी प्रतीक इंडस्ट्रियल को-ऑपरेटिव्ह सोसायटी, ओगलेवाडी, ता. कराड या नावाने बोगस संस्था स्थापन केली होती. जैविक कोळसा उत्पादनासाठी या संस्थेने शासनाकडे केलेल्या अनुदान मागणीवरुन संस्थेस 6 कोटी 88 लाखांचे  मंजूर केले. त्या अनुदानाचा पहिला हप्ता 1 कोटी रुपये या प्रतीक इंडस्ट्रियल सोसायटीला देण्यात आला. परंतु, जैविक कोळसा उत्पादनासाठी मिळालेल्या 1 कोटी अनुदानाचा योग्य वापर न करता व शासनाच्या नियमानुसार काम न करता सोसायटीचे चेअरमन, सचिव व संचालकांनी शासनाच्या अनुदान मिळालेल्या 1 कोटी रुपयांचा अपहार केल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर कराड सहकारी संस्था दुय्यम निबंधक कार्यालयातील लेखा परीक्षक जब्बार शेख यांनी दि.27 ऑक्टोबर रोजी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या फिर्यादीवरुन सोसायटीचे चेअरमन, सचिव व संचालक अशा 13 जणांवर गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद कांबळे यांनी केला. त्यामध्ये शासनाकडून अनुदान म्हणून मिळालेले 1 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे समारे आल्याने व त्याबाबतचे पुरावे मिळाल्याने त्यांनी या प्रकरणी बोगस संस्थेचा चेअरमन संतोष लाड व सचिव गणेश साळुंखे या दोघांना शुक्रवारी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: