Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
चालकाकडून ट्रकची परस्पर विक्री
ऐक्य समूह
Saturday, February 03, 2018 AT 11:19 AM (IST)
Tags: re5
5कराड, दि.2 : कोचीन येथे भाडे घेऊन जातो, असे सांगून चालकाने घेऊन गेलेल्या ट्रकची परस्पर विक्री केल्याची फिर्याद ट्रक मालकाने कराड तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. जसवंत जयकर हुलवान, रा.कार्वे असे संशयित चालकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, संभाजी जगताप यांच्या मालकीच्या ट्रकवर (क्र. एम.एच.11 एन 6575) जसवंत  हुलवान चालक म्हणून कामास होता. 6 डिसेंबर रोजी सकाळी 9 च्या सुमारास कोचीनचे भाडे आले असून तिकडे जायचे आहे, असे सांगून हुलवान ट्रक घेऊन गेला. मात्र, बरेच दिवस होऊनही तो परत न आल्याने संभाजी जगताप यांनी खात्री केली असता त्यांचा ट्रक चालकाने परस्पर विकला असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी आज तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: