Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
महिलेचे अपहरण करून विष पाजण्याचा प्रयत्न
ऐक्य समूह
Saturday, February 03, 2018 AT 11:12 AM (IST)
Tags: re2
वडूज पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा
5वडूज,  दि. 2 : येथील पेडगाव रोडवर कामानिमित्त आलेल्या एका महिलेचे अपहरण करून माझ्यावरील तक्रार माघारी घे, असे म्हणत तिला विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पाच जणांविरुद्ध वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, तुषार भोसले व दोन अनोळखी व्यक्ती (रा. दहिवडी, ता. माण) यांनी बुधवार, दि. 24 रोजी रात्री 9 च्या सुमारास संबंधित महिला पेडगाव रस्ता येथे तिच्या कामानिमित्त गेली असता तेथून तिला सफेद रंगाच्या चार चाकी गाडीमध्ये जबरदस्तीने बसवून शिवेंद्र ढाबा, खांडसरी चौक, दहिवडी येथील खोलीमध्ये नेले व तेथे तुषार, त्याचे आई, वडील व दोन अनोळखी इसमाने तू आमच्या विरुद्ध केलेली तक्रार माघारी घे, असे म्हणून विष पाजले. महिलेवर जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. घटनेची नोंद वडूज पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस उपनिरीक्षक धरणीधर कोळेकर तपास करत आहेत.
  
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: